जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कोथींबीरीसह कोबीचं पिकं मातीत, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका
- 29 मई
- 1 मिनट पठन

जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाने भाज्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा माव, गावात एक एकर कोथिंबीर पाण्याखाली गेली आहे. तर घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे गोबी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. हातातोंडाशी आलेला घास या मुसळधार पावसामुळं हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळं नदी-नाले तुडुंब
जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळं फळपीकाबरोबर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा माव येथील शेतकरी नाथाजी खवल यांच्या शेतात विक्रीला आलेली कोथिंबीर गेल्या तीन दिवसापासून पाण्याखाली गेली आहे. यामुळं त्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. तर घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील कोबीचं पिक मातीत मिसळलंय. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून फळपिक उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
महत्वाच्या बातम्या:














टिप्पणियां