LIVE मॅचमध्ये धक्काबुक्की, भर मैदानात दोन खेळाडू भिडले! अंपायरने केली मध्यस्थी अन्यथा... भांडणाचा VIDEO समोर
- wix2266@gmail.com
- May 29
- 2 min read

LIVE मॅचमध्ये धक्काबुक्की, भर मैदानात दोन खेळाडू भिडले...
खरं तर, ही घटना ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका इमर्जिंग आणि बांगलादेश इमर्जिंग यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यादरम्यान घडली. खेळाच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू त्शेपो न्तुली आणि बांगलादेशचा रिपन मोंडोल यांच्यात जोरदार वाद झाला, दोन्ही खेळाडू एकमेकांना ढकलताना दिसले. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले आणि बांगलादेशचा रिपन मोंडोलनेही बॅट मारण्याचा प्रयत्न केला.
अंपायरने केली मध्यस्थी अन्यथा... भांडणाचा VIDEO समोर
मिळालेल्या माहितीनुसार, रिपन मंडलने त्शेपो न्तुलीच्या चेंडूवर षटकार मारला, तेव्हा ही घटना घडली. शॉट मारल्यानंतर दोन्ही खेळाडूंच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि रागाच्या भरात न्टुलीने रिपनला ढकलले. एवढेच नाही तर न्टुलीने रिपनचे हेल्मेट ओढले, ज्यामुळे वातावरण तापले. पंच कमरउज्जमान यांनी लगेच हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही खेळाडूंमधील गरमागरमी इतके वाढले की जर पंचांनी हस्तक्षेप केला नसता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. दोन्ही संघांमधील हा दौरा 3 एकदिवसीय सामन्यांनी सुरू झाला होता, जिथे बांगलादेशने 2-1 असा विजय मिळवला. त्याच वेळी, अनधिकृत कसोटी खेळली जात आहे.
दोन्ही खेळाडूंवर होणार कारवाई...
सामना अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही तात्काळ कारवाई केलेली नाही, कारण प्रोटोकॉलनुसार कोणत्याही प्रकारची शिक्षा जाहीर करण्यापूर्वी मैदानी पंचांना अधिकृत अहवाल सादर करावा लागतो. ESPNcricinfo च्या अहवालानुसार, सामनाधिकारी या घटनेचा अहवाल BCB आणि CSA दोघांनाही सादर करतील, ज्यांना कारवाई करण्याची अपेक्षा आहे, विशेषतः कारण हा दौऱ्याचा शेवटचा सामना आहे.
हे ही वाचा -
Comments