Padma Shri Ashok Saraf Video: पद्मश्री अशोक सराफांसाठी पायलट भाचीची इमोशनल अनाउन्समेंट, मामांसाठी विमानात टाळ्यांचा कडकडाट VIDEO
- 29 मई
- 1 मिनट पठन

'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी, 27 मे रोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात खास सन्मान करण्यात आला. राष्ट्रपतींच्या हस्ते भारतातील 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. वेळी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.पुरस्कार स्विकारल्यानंतर अशोक सराफ दिल्लीहून मुंबईला रवाना झाले, त्याचवेळी त्यांनी एक गोड क्षण अनुभवला.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची भाची अदिती परांजपे पायलट आहे. अशोक सराफ ज्या फ्लाईटनं मुंबईला परतत होते, अदिती नेमकी त्याच फ्लाईटची फ्लाइट कॅप्टन होती. यावेळी तिनं अशोक सराफ यांच्या झालेल्या सन्मानाबद्दल विमानात खास अनाउन्समेंट केली.
अदिती परांजपे म्हणाली की, "एक खूपच खास, भावनिक आणि आयुष्यात एकदाच घडणारं असं उड्डाण. अशोक काकांसोबत उड्डाण करता आलं ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. तुमचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन."














टिप्पणियां